बँक ऑफ महाराष्ट्रच्या चिरनेर शाखेत पैशाचा तुटवडा; खातेदारांमध्ये नाराजीचा सूर

चिरनेर पंचक्रोशीतील हजारो गरीब गरजू खातेदार रहिवाशांनी आपापली पुंजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जमा केली आहे. परंतु बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे खातेदारांना वेळेवर स्वतःचे पैसेच मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या चिरनेर शाखेत पैशाचा तुटवडा; खातेदारांमध्ये नाराजीचा सूर

उरण : बँक ऑफ महाराष्ट्रच्या चिरनेर शाखेतून खातेदारांना गरजेच्या वेळी पैसेच मिळत नाही. त्यामुळे खातेदारांना बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे हात हलवत घरी परतावे लागत असल्याने खातेदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

चिरनेर पंचक्रोशीतील हजारो गरीब गरजू खातेदार रहिवाशांनी आपापली पुंजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जमा केली आहे. परंतु बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे खातेदारांना वेळेवर स्वतःचे पैसेच मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक खातेदारांना बँकेतून हात हालवित घरी परतावे लागत असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र शाखेबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.

यासंदर्भात बँक ऑफ महाराष्ट्र चिरनेर शाखेकडे विचारणा केली असता बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापनाने उर्मटपणे नाव न सांगता सांगितले की सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्याने बँकेत वेळेवर पैसे येत नाहीत. त्यामुळे आम्ही खातेदारांना बँकेतून पैसे देऊ शकत नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in