क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून उकळले १२ लाख

ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल १२ लाख २१ हजारांची रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून उकळले १२ लाख

नवी मुंबई : क्राईम ब्रँचमधील अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने सीवूड्स भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या आधार कार्डचा चुकीची वस्तू खरेदी करण्यासाठी वापर झाल्याची भीती दाखवली. तसेच त्यांचे बँक खाती तपासण्याच्या बहाण्याने सदर ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल १२ लाख २१ हजारांची रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक सीवूड्समध्ये राहण्यास असून गत १० एप्रिल रोजी त्यांना अज्ञात सायबर टोळीतील एका सदस्याने फेडेक्समधून बोलत असल्याचे भासवून संपर्क साधला होता. तसेच अज्ञात व्यक्तीने त्यांच्या आधार कार्डचा चुकीची वस्तू खरेदी करण्यासाठी वापर केल्याचे सांगून त्यांना सायबर क्राईममध्ये तक्रार करण्यास सांगितले. यावर ज्येष्ठ नागरिकाने ऑनलाईन तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर सदर सायबर चोरट्याने त्यांचा कॉल क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याशी जोडून देत असल्याचे भासवले. त्यांनतर दुसऱ्या सायबर चोरट्याने तो मुंबई क्राईम ब्रँचमधील डीसीपी प्रदीप सावंत असल्याचे भासवून त्यांच्या आधारकार्डचा गैरवापर करणाऱ्या मोहम्मद अली नामक व्यक्तीला पकडल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडे त्याबाबत चौकशी करण्याकरीता स्काईप हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

त्यानुसार ज्येष्ठ नागरिकाने १२ लाख २१ हजार रुपये ट्रान्सफर केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in