धावत्या लोकलमध्ये प्रसुती कळा; जनरल डब्यातील महिला मदतीला धावल्या अन्...

उरण – नेरुळ लोकलने प्रवास करणाऱ्या उरणमधील एका महिलेची चालत्या लोकलमध्येच प्रसूती झाली आहे. लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला सहप्रवाशांच्या मदतीने ही प्रसुती झाली. यात या महिलेला मुलगी झाली आहे.
धावत्या लोकलमध्ये प्रसुती कळा; जनरल डब्यातील महिला मदतीला धावल्या अन्...

उरण : उरण – नेरुळ लोकलने प्रवास करणाऱ्या उरणमधील एका महिलेची चालत्या लोकलमध्येच प्रसूती झाली आहे. लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला सहप्रवाशांच्या मदतीने ही प्रसुती झाली. यात या महिलेला मुलगी झाली आहे. जनरल डब्यातील महिला आणि मुलींनी मदतीचा हात पुढे करीत प्रसूत झालेल्या महिलेला मदत केली आणि इतर प्रवाशांनी लोकल चालकाला या बाबतची माहिती दिल्यानंतर नेरुळ स्थानकात या महिलेला उतरवून रेल्वे पोलीसांच्या सहकार्याने नेरुळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती महिलेचे पती मुजीम सय्यद यांनी दिली आहे.

उरणच्या भवरा परिसरात रहाणाऱ्या आणि मोलमजुरी करून गुजराण करणारे सय्यद यांच्या गरोदर पत्नीला सोमवारी रात्रीपासूनच त्रास सुरू झाला. त्यांनी रात्री रुग्णालयात जाऊन तपासणी केली. बरं वाटत असल्याने सकाळी ते ७.५० च्या उरण नेरुळ लोकलमधून नेरुळला जात होते.

लोकल उलवे नोड मधील बामणडोंगरी स्थानकात ८.२० वाजता पोहचली असता, या महिलेला पोटात प्रसूती कळ आली. त्याचवेळी तिची धावत्या लोकलमध्ये प्रसूती झाली. त्याचक्षणी डब्यातील निकिता शेवेकर या आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी याच डब्यातून जात होत्या. त्यांनी पुढाकार घेत प्रवास करणाऱ्या इतर महिला आणि मुलींच्या सहकार्याने ओढण्या गोळा करून पडदे धरले आणि नेरुळ स्थानकापर्यंत प्रसूत महिलेला धीर दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in