अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करणे महागात

सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करणे महागात
Published on

नवी मुंबई : अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करणे ऐरोलीत राहणाऱ्या आयटी कंपनीतील एका कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीने ज्या लिंकवर क्लिक केले. त्या लिंकच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी क्रेडिट कार्डधारकाची संपूर्ण माहिती मिळवून त्यांच्या क्रेडिट कार्डवरून १ लाख ९० हजारांची खरेदी करून त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार किशोर (४०) हे ऐरोली सेक्टर-८ मध्ये राहण्यास असून ते ठाण्यातील आयटी पार्कमध्ये कामाला आहेत. गत १९ ऑक्टोबर रोजी किशोर आपल्या घरी असताना, त्यांच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी एक मेसेज पाठवून त्यांच्या क्रेडिट कार्डवर ९८५० रुपयांचे रिवार्ड मिळत असल्याचे तसेच त्याची मुदत संपत असल्याचे तसेच सदर रिवॉर्ड मिळवण्यास लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात आले होते. किशोर यांच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असल्याने सदरचा मेसेज बँकेकडून पाठविण्यात आला असावा, असे वाटल्याने त्यांनी मेसेजमधील सूचनेप्रमाणे लिकंवर क्लिक केले होते.

logo
marathi.freepressjournal.in