'माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तेव्हा...' काय म्हणाले मुख्यमंत्री?

पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना
'माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तेव्हा...' काय म्हणाले मुख्यमंत्री?

आज नवी मुंबईच्या खारघरमधील आयोजित सोहळ्यामध्ये पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच, लाखो श्रीसेवकांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "उद्ध्वस्त होणाऱ्या लाखो कुटुंब, भरकटणाऱ्या कुटुंबांना दिशा देण्याचे काम आप्पासाहेब धर्माधकारी आणि दिवंगत नानासाहेब धर्माधकारी यांनी केले. आता त्यांचे कार्य सचिन धर्माधिकारी पुढे घेऊन जात असून या लाखो कुटुंबामध्ये माझेही एक कुटुंब होते. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला, तेव्हा मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी आधार दिला. तर, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला या समजाची सेवा करण्यासाठी मार्गदर्शन केले आणि योग्य दिशा दाखवली. म्हणूनच मी आज तुम्हासर्वांसमोर फक्त एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर श्रीसदस्य म्हणून उभा आहे." अशा भवन त्यांनी व्यक्त केल्या.

logo
marathi.freepressjournal.in