
मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापती आणि उपसभापदी पदाच्या निवडणुका गेली दोन वर्षे का झाल्या नाहीत, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला. न्यायमर्ती जी.एस.कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या खंडपीठाने या निवडणूका दोन आठवड्यात घ्या, असा आदेशच दिला.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक ढक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी दोन वर्षापूर्वी २१ नोव्हेबर २०२२ मध्ये पदाचा रातीनामा दिला. तो त्याच दिवशी मंजूर करण्यात आला. त्यानंतर गेली दोन वर्षे ही पदे रिक्त असल्याने नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जयदत्त होळकर यांनी अॅड. भुषण देशमुख यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेवर झाली. यावेळी अॅड भुषण देशमुख यांनी सभापती आणि उपसभापती ही पदे गेली दोन वर्षे रिक्त आहेत याकडे न्यायालयाचे लक्ष वेधत निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश द्या, अशी विनंती केली. याची दखल खंडपीठाने घेतली.