कंत्राटदाराकडून बनावट बँक गॅरेंटीद्वारे पनवेल महापालिकेची फसवणूक

लातूर येथील मे. श्रीनाथ इंजिनिअर या कंत्राटदाराने बनावट बँक गॅरेंटी सादर करून पनवेल महापालिकेतील सार्वजनिक शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीची तसेच मलनि:सारण वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कोट्यवधींची कामे मिळवून पनवेल महापालिकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
कंत्राटदाराकडून बनावट बँक गॅरेंटीद्वारे पनवेल महापालिकेची फसवणूक

नवी मुंबई : लातूर येथील मे. श्रीनाथ इंजिनिअर या कंत्राटदाराने बनावट बँक गॅरेंटी सादर करून पनवेल महापालिकेतील सार्वजनिक शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीची तसेच मलनि:सारण वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कोट्यवधींची कामे मिळवून पनवेल महापालिकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील कंत्राटदाराविरोधात बनावट कागदपत्रे तयार करून पनवेल महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

सन २०२२ मध्ये पनवेल महापालिकेच्या मालकीच्या सर्व सार्वजनिक शौचालयांचे दोन वर्षांसाठी निगा, दुरुस्ती व नूतनीकरणाचे तसेच सिडकोने विकसीत केलेल्या खारघर नोडमधील मलनि:सारण वाहिन्यांची दोन वर्षासाठी दुरुस्ती, सुधारणा व नूतनीकरण करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्यावेळी लातूर येथील मे.श्रीनाथ इंजिनिअरतर्फे गोपालकृष्ण लड्डा या कंत्राटदाराने शौचालय देखभाल दुरुस्ती कामाच्या ई निविदेमध्ये २२ टक्के कमी दराची निविदा भरली होती. तसेच मलनि:सारण वाहिन्यांची दुरुस्ती, सुधारणा या कामाच्या ई-निविदेमध्ये २३ टक्के कमी दराची निविदा भरली होती.

या दोन्ही निविदा कमी दराच्या असल्याने महापालिकेने ही दोन्ही कामे मे. श्रीनाथ इंजिनिअर या कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेऊन त्याच्याकडून शासन निर्णयाप्रमाणे पहिल्या कामासाठी ५८ लाख ९१ हजार ४२० रुपयांची अतिरिक्त सुरक्षा अनामत ठेव रक्कम (बँक गँरेंटी) तसेच दुसऱ्या कामासाठी ७३ लाख ७९ हजार ८०९ रुपयांची अतिरिक्त सुरक्षा अनामत ठेव रकमेची (बँक गँरेंटी) मागणी केली होती; मात्र, मे. श्रीनाथ इंजिनिअर या कंत्राटदाराने त्यावेळी लातूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे वरील रक्कमेचे अतिरिक्त सुरक्षा अनामत ठेव रकमेची स्वरूपातील दोन बनावट कागदपत्रे पनवेल महापालिकेकडे सादर करून दोन्ही कामे मिळवली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in