क्रेडाई प्रॉपर्टी एक्झिबिशन आता रायगडमध्ये, २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान मालमत्ता प्रदर्शन

अटल सेतूचे उद्धाटन झाल्याने मुंबई केवळ २० मिनिटात येणार असल्याने या मालमत्ता प्रदर्शनाला मुंबईतील लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली आहे.
क्रेडाई प्रॉपर्टी एक्झिबिशन आता रायगडमध्ये, २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान मालमत्ता प्रदर्शन

नवी मुंबई : क्रेडाई रायगडतर्फे भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या मालमत्ता प्रदर्शनात एकाच छताखाली उरण नवी मुंबई पनवेल ते थेट खोपोलीपर्यंतचे पर्याय पाहता येणार आहेत. अटल सेतूचे उद्धाटन झाल्याने मुंबई केवळ २० मिनिटात येणार असल्याने या मालमत्ता प्रदर्शनाला मुंबईतील लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली आहे.

वाशीतील मालमत्ता प्रदर्शनात अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाल्याने क्रेडाई रायगडने प्रॉपर्टी एक्सिबिशन भरवले आहे. हे प्रदर्शन २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान खांदेश्वर रेल्वे स्थानक कामोठे येथे असणार आहे. आता नाही तर कधीच नाही हे स्लोगन या प्रदर्शनास देण्यात आले आहे. नवी मुंबईत साकार झालेल्या सी लिंक प्रकल्पामुळे मुंबई अवघ्या वीस मिनिटांवर आली असल्याने मुंबईतील ग्राहक नवी मुंबईत वळेल अशी आशा पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. या प्रदर्शनात १५ लाख ते ३ कोटी पर्यंतची घरे तसेच व्यावसायिक कार्यालय गाळे उपलब्ध आहेत. जे मुंबईच्या तुलनेत एकदम कमी किमतीत आहेत, असा दावाही करण्यात आला. या मालमत्ता प्रदर्शनात किमान ७०० पर्यंत बूकिंग मिळेल अशी आशा रायगड क्रेडाई पदाधिकारी वसंत भद्रा यांनी व्यक्त केली आहे. सध्या मालमत्ता बाजार परिस्थिती पाहता सध्याचे दर भविष्यातील दरांपेक्षा कमी असल्याने ही सुवर्ण संधी सोडू नये असे सेक्रेटरी मनसुख पटेल यांनी सांगितले. तर, मालमत्ता घेण्यासाठी वा गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने एकदा तरी प्रदर्शनास भेट द्यावी नक्कीच फायदा होईल. कारण एकाच छताखाली हवे तेवढे आणि हवे तसे ऑप्शन उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले.

मुंबईपासून नवी मुंबई रायगड या ठिकाणी येणाऱ्यांसाठी जिथे दीड ते दोन तास लागत होते तेथे आता सी लिंकमुळे केवळ वीस मिनिटात पोहोचता येते. त्यामुळे शिवडी आणि आसपासच्या ५ किलोमीटर परिसरातील रहिवाशांना निवांत आणि मोठ्या घरात राहण्यासाठी नवी मुंबई, रायगड उत्तम आणि आर्थिक दृश्य परवडणारा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता मुंबईतील क्राऊड नवी मुंबईला पसंती देत आहे. अशा लोकांना हे प्रदर्शन पथदर्शी ठरेल असे निमंत्रक विघ्नेश पटेल यांनी म्हटले.

आता नाही तर कधीच नाही हे स्लोगन यासाठी देण्यात आले आहे. नवी मुंबई रायगड परिसरातील घरांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यात वाढते अन्य दर पाहता भविष्यात किमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे सर्व सामान्यांनी आता नाही तर कधीच नाही असा निश्चय करीत घर घेतले तर स्वस्तात मिळू शकते, असे क्रेडाई रायगडचे अध्यक्ष अश्विन पटेल म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in