कारच्या बोनेटवर फटाके लावून वाढदिवस महागात पडला, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

काही वाहनचालकांनी आपल्या मोबाईलवरून याचे चित्रिकण केले होते. त्यांनतर सदर व्हिडीओ व्हायरल झाला होता.
कारच्या बोनेटवर फटाके लावून वाढदिवस महागात पडला, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

नवी मुंबई : फॉर्च्युनर कारच्या बोनेटवर आकाशात उडणारे फटाके लावून पामबीच मार्गावर भरधाव कार चालवून वाढदिवसाचा आनंद साजरा करणे कोपरी गावातील दोघा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. या तरुणांनी कारच्या बोनेटवर आकाशात उडणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी करत सार्वजनिक रस्त्यावर भरधाव कार चालवून इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याने त्यांच्या विरोधात एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे नयन नंदकुमार पाटील (२१) व वंश मिश्रा (२१) अशी असून हे दोघेही वाशीतील कोपरी गावात राहण्यास आहेत. गत २९ जानेवारी रोजी नयन पाटील याचा वाढदिवस असल्याने त्याने त्या दिवशी यशवंत पाटील याची फॉर्च्युनर कार चालवण्यास घेतली होती. त्यानंतर नयन पाटील याने मध्यरात्री सदर फॉर्च्युनर कारच्या बोनेटवर आकाशात उडणारे फटाके लावून त्याची आतिशबाजी करत सदर कार पामबीच मार्गावरील किल्ला जंक्शन ते एनआरआय सिग्नल दरम्यान, भरधाव वेगात चालवून नेली होती.

काही वाहनचालकांनी आपल्या मोबाईलवरून याचे चित्रिकण केले होते. त्यांनतर सदर व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबतची माहिती एनआरआय पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर फॉर्च्युनर कारचा शोध घेतला असता, २९ जानेवारी रोजी नयन पाटील व त्याचा मित्र वंश मिश्रा या दोघांनी सदरचे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य करणाऱ्या नयन पाटील व वंश मिश्रा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in