उरणमध्ये बांध फुटून दोघा मुलांचा मृत्यू

उरणमध्ये बांध फुटून दोघा मुलांचा मृत्यू

खाडी किनाऱ्यावरील बांध बंदिस्ती फुटल्याने चिखलात मुले रुतली गेल्याची दुदैवी घटना घडली.

उरण : तालुक्यातील वेश्वी आदिवासी वाडीवरील मुले दिघोडे- धुतूम खाडी किनाऱ्यावर मच्छी पकडण्यासाठी गेली असता, किनाऱ्यावरील बांध बंदिस्ती फुटल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडी वरील मुले ही नेहमी प्रमाणे मासेमारी करण्यासाठी दिघोडे - धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावर सोमवारी (दि२६) सायंकाळी ठिक ५ च्या सुमारास गेली होती; मात्र खाडी किनाऱ्यावरील बांध बंदिस्ती फुटल्याने चिखलात मुले रुतली गेल्याची दुदैवी घटना घडली. यात दोन मुले दगावल्याची माहिती मिळत असून, उरण पोलिसांनी तसेच वेश्वी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील तांबोळी, धुतूम ग्रामपंचायतीचे सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन आदिवासी मुलांचे जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in