अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

अग्निशमन जवानांनी आपल्या दिवंगत साहसी सहकाऱ्याला सलामी देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील चौक गावाच्या नजीक असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच नवी मुंबई मनपा अग्निशमन दल मदतकार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले. मुसळधार पावसात मदतकार्यासाठी डोंगरावर चढत असताना अग्निशमन कर्मचारी शिवराम ढुमणे यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी जात असताना, त्यांच्यासमवेत वैद्यकीय पथकही होते. शिवराम यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर वैद्यकीय पथकातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, मात्र काही उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा रक्तदाब धोक्याच्या पातळीखाली आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शिवराम हे सीबीडी अग्निशमन दलात सहाय्यक केंद्र अधिकारी म्हणून काम पाहत होते. सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव सीबीडी अग्निशमन कार्यालय येथे आणण्यात आले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या वतीने उपस्थित अग्निशमन जवानांनी आपल्या दिवंगत साहसी सहकाऱ्याला सलामी देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

logo
marathi.freepressjournal.in