ट्रेलर मागे घेताना चाकाखाली आलेल्या व्यक्तीचा मृत्यू

या अपघातातील मृत व्यक्तीचे नाव रामआशिष केवट (३७) असे असून तो नावडे फाटा येथील पार्किंगच्या आवारात खाली झोपला होता
ट्रेलर मागे घेताना चाकाखाली आलेल्या व्यक्तीचा मृत्यू
Published on

नवी मुंबई : तळोजा नावडे फाटा येथील पार्किंगमध्ये ट्रेलरचालकाने पाठीमागे झोपलेल्या व्यक्तीची खातरजमा न करता, ट्रेलर पाठीमागे घेतल्याने सदर ट्रेलच्या चाकाखाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गत २९ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातातील मृत व्यक्तीचे नाव रामआशिष केवट (३७) असे असून तो नावडे फाटा येथील पार्किंगच्या आवारात खाली झोपला होता. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास या पार्किंगमधून ट्रेलर घेऊन जाण्यासाठी आलेल्या चालक गोपाळ साहुने सदरचा ट्रेलर मागे घेत असताना ट्रेलरच्या मागे कुणी व्यक्ती आहे, याची खात्री न करता त्याकडे दुर्लक्ष करून ट्रेलर मागे घेतला. त्यामुळे त्याठिकाणी झोपलेल्या रामआशिष केवट याच्या अंगावरून ट्रेलरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घनेनंतर तळोजा पोलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

logo
marathi.freepressjournal.in