नवी मुंबईत स्कुटी अपघातात डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

मृत झालेल्या तरुणाचे नाव सुबोधकुमार नारायण यादव (२५) असे असून तो मूळचा बिहार राज्यातला आहे.
नवी मुंबईत स्कुटी अपघातात डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

नवी मुंबई : जेवणाचे पार्सल पोहोचवून परतणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे भरधाव स्कुटीवरील नियंत्रण सुटल्याने मृत्यू झाल्याची घटना एपीएमसी मार्केटमध्ये गुरुवारी मध्यरात्री घडली. या अपघातातील मृत डिलिव्हरी बॉयने भरधाव स्कुटी चालवून नेल्यामुळे सदर अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने एपीएमसी पोलिसांनी मृत डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मृत झालेल्या तरुणाचे नाव सुबोधकुमार नारायण यादव (२५) असे असून तो मूळचा बिहार राज्यातला आहे. सध्या तो एपीएमसी सेक्टर-१९ मधील हॉटेल देवीप्रसाद बारमध्ये जेवणाचे पार्सल डिलिव्हरीचे काम करून त्याच ठिकाणी राहत होता. गुरुवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास सुबोधकुमार हा वाशी परिसरातील जेवणाच्या पार्सलची ऑर्डर घेऊन स्कुटीवरून जात होता. यावेळी तो पार्सल देऊन हॉटेलमध्ये परतत असताना, दाणा मार्केट गेटसमोर सुबोधकुमार याचे भरधाव वेगात असलेल्या स्कूटरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तो रस्ता दुभाजकाला घासत जाऊन स्कुटीसह जोरात खाली पडला.

logo
marathi.freepressjournal.in