गणेशोत्सवादरम्यान फळांची मागणी वाढली

घाऊक बाजारात सफरचंद, डाळींब,मोसंबी, संत्री आणि सीताफळ यांची मागणी वाढली आहे.
गणेशोत्सवादरम्यान फळांची मागणी वाढली

नवी मुंबई : गणेशोत्सवादरम्यान फळांना अधिक मागणी असते. घाऊक बाजारात फळांची आवक कमी असून, विविध फळांना अधिक मागणी वाढल्याने बाजारभाव २०% ने वाढले आहेत. घाऊक बाजारात सफरचंद, डाळींब,मोसंबी, संत्री आणि सीताफळ यांची मागणी वाढली आहे.
गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, सजावट, पूजा साहित्यासह ग्राहकांची फळांना अधिक मागणी आहे. बाप्पाला विविध प्रकारची मोदक, मिठाई बरोबरच फळांचा नैवेद्य ही दाखवला जातो. त्यामुळे या कालावधीत फळांचे बाजारभाव चढेच राहणार असल्याची प्रतिक्रिया व्यपाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात सफरचंद, सीताफळ या फळांची आवक जास्त होत असते. त्यामध्ये हिमाचल मधील शिमला सफरचंद बाजारात दाखल होताच भाव वाढ होते. शिमला सफरचंद हे एक नंबरचे आणि सर्वात जास्त चांगल्या दर्जाचे असते. सफरचंद १८११ क्विंटल, डाळींब ७४७ क्विंटल, सीताफळ १०८१ क्विंटल, मोसंबी ३०५६ क्विंटल, संत्री ५६८ क्विंटल आवक होत आहे.

असे आहेत फळांचे दर

घाऊक बाजारात काश्मिरी सफरचंदचे २० ते २५ किलोला २०००रु ते ३५०० रु तर करकोळीत प्रतिकिलो १८०-२५०रुपये , घाऊक मध्ये डाळिंब १००रु ते २५० रु तर करकोळ बाजारात १८०रु ते २५०रु , घाऊकमध्ये सीताफळ प्रतिकिलो ४०रु ते१५० तर करकोळ बाजारात १००रु ते १५०रुपयांवर उपलब्ध आहे. गणेशोत्सवात केळीला ही अधिक मागणी असते. जळगाव, धुळे येथून केळीची आवक होत असून, किरकोळ मध्ये प्रति डझन केळी ४०-६०रुपये दर आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in