नवी मुंबई : मोदी @९ महा-जनसंपर्क-अभियान 'विकास तीर्थ' कार्यक्रमांतर्गत 'टाकावू पासून टिकाऊ' या संकल्पनेतून मोडकळीस आलेल्या बसेसचे रूपांतर महिला व पुरुषांकरिता अत्याधुनिक २ बस टॉयलेटचे उदघाटन न.मुं.म.पा.आयुक्त राजेश नार्वेकर, आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त देशभरात विकास कामांचा अहवाल जनतेच्या घरा घरात पोहचविण्याचे काम चालू आहे. तसेच न.मुं.म.पा च्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आमदार मंदा म्हात्रे यांच्या 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेतून मोडकळीस आलेल्या ४ बसेसचे रूपांतर करून महिला व पुरुषांकरिता २ बसेसचे उदघाटन शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी आमदार मंदा म्हात्रे, न.मुं.म.पा.आयुक्त राजेश नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा विभाग उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, महामंत्री निलेश म्हात्रे, डॉ राजेश पाटिल, विजय घाटे, आदी उपस्थित होते.
सुरक्षा रक्षकाचीही नेमणूक करणार
या बस सायन पनवेल महामार्गावर जुईनगर हायवेलगत लांब पल्ल्याच्या खाजगी बसेस उभ्या असतात व नवी मुंबईतील असंख्य नागरिक हे सायन-पनवेल हायवे मार्गाने प्रवास करतात. जेणेकरुन विशेषत: येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांसाठी तिथे शौचालयाची व्यवस्था नसते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला पुरुष यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचीही नेमणूक करण्यात येणार आहे.