मुंबई मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महापलिका आयुक्तांची उल्लेखनीय कामगिरी; ११व्यांदा सहभाग; ४२ किमी अंतर ४ तास ३९ मिनिटांत पूर्ण

डॉ. शिंदे यांनी ४२ किलोमीटरचे अंतर ४ तास ३९ मिनिटे २३ सेकंदांत पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत धावपटूंचा सहभाग असलेल्या या मॅरेथॉनमध्ये आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Published on

नवी मुंबई : धावणे हा सर्वोत्तम व्यायाम असल्याची जाणीव मनोमन ठेवत, धावण्याच्या आवडीला ध्यासात रूपांतर करणारे आणि अत्यंत व्यस्त प्रशासकीय दिनक्रमातूनही पहाटे नियमित सराव करणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुंबईत झालेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या २१व्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये अकराव्यांदा सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली.

डॉ. शिंदे यांनी ४२ किलोमीटरचे अंतर ४ तास ३९ मिनिटे २३ सेकंदांत पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत धावपटूंचा सहभाग असलेल्या या मॅरेथॉनमध्ये आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

गतवर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जागतिक स्तरावरील मानाच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी होत डॉ. शिंदे यांनी ८६.६ किलोमीटरचे अंतर ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदांत पूर्ण केले होते. या जागतिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे ते एकमेव भारतीय सनदी अधिकारी ठरले होते. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली होती. नुकत्याच पार पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अत्यंत सुव्यवस्थितरीत्या पार पडल्या. या निवडणुकांच्या काळात आयुक्त म्हणून अत्यंत व्यस्त कामकाज असतानाही डॉ. कैलास शिंदे यांनी पहाटे नियमित धावण्याचा सराव सुरू ठेवला.

वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे, दिवसभर आणि उशिरापर्यंत प्रशासकीय कामकाज पार पाडणे, तरीही आपल्या फिटनेस सरावात कोणताही खंड पडू न देणे, हे त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचे प्रतीक आहे. निश्चित ध्येय, अथक परिश्रम, काटेकोर नियोजन आणि मानसिक दृढता या बलस्थानांच्या जोरावरच त्यांनी हे यश संपादन केल्याचे दिसून येते.

logo
marathi.freepressjournal.in