नवी मुंबईत १० कोटींचे अमली पदार्थ नष्ट

१० कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांची बुधवारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड या कंपनीमध्ये शास्रोक्त पद्धतीने नष्ट करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
नवी मुंबईत १० कोटींचे अमली पदार्थ नष्ट
एक्स @airnews_mumbai
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याविरोधात धडक कारवाई करून मागील दोन वर्षात जप्त केलेले तब्बल १० कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांची बुधवारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड या कंपनीमध्ये शास्रोक्त पद्धतीने नष्ट करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या अमली पदांर्थामध्ये १४० किलो वजनाचे एमडी, हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस, अफीम व एलएसडी पेपर यासारख्या घातक अमली पदार्थांसह ५००किलो गुटख्याचा समावेश आहे. यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आणि विविध पोलीस ठाणे यांनी गेल्या दोन वर्षात एमडी, हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस, अफीम व एलएसडी पेपर यासारखे घातक अमली पदार्थ तसेच गुटखा हस्तगत केला होता. नशामुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून बुधवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण ४० गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेले १० कोटींचे अमली पदार्थ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नष्ट करण्यात आला.

तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड या कंपनीतील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा केंद्रात १४० किलो वजनाचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ तसेच ५०० किलो गुटख्याचा साठा शास्रोक्त पद्धतीने नष्ट करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या या सर्व अमली पदार्थांची किंमत सुमारे १० कोटी रुपये इतकी आहे.

logo
marathi.freepressjournal.in