उन्हाची काहिली वाढली; गारवा मिळविण्यासाठी नागरिकांची उसाच्या रसाला पसंती

उरण शहरातील लाल मैदान जवळ असलेल्या अमृत सोंडकर यांचे असलेले नवनाथ रसवंतीगृह येथे विलास फदाल व त्यांची पत्नी शशिकला फदाले हे उसाचा रस विक्रेते धंदा करीत आहेत.
उन्हाची काहिली वाढली; गारवा मिळविण्यासाठी नागरिकांची उसाच्या रसाला पसंती

उरण : कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडू लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नागरिकांचे पाय उसाचा रस व बर्फखरेदीकडे वळत आहेत. मार्च महिना उजाडला आणि वातावरणात उष्णतेचे प्रमाण कमालीने वाढल्याने शरीराला थंडावा मिळण्यासाठी प्रत्येक नागरिक वेगवेगळे शीत पेये पिऊन उन्हाची काहीली कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. ताक, कोल्ड्रिंक, नारळपाणी, लस्सी, तर कुणी उसाचा रस पिणे पसंत करतात.

मागील दोन दिवसांत उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे अनेकजण शरीराला थंडावा मिळण्यासाठी गुणकारी अशा उसाचा रस पिण्याला महत्त्व देत आहेत. सध्या शहरामध्ये उसाच्या रसाच्या गाड्या गलोगल्ली फिरत असल्याने नागरिकांना दारातच ताजातवाना अशा उसाच्या रसाचा आस्वाद घेता येत आहे.

उरण शहरातील लाल मैदान जवळ असलेल्या अमृत सोंडकर यांचे असलेले नवनाथ रसवंतीगृह येथे विलास फदाल व त्यांची पत्नी शशिकला फदाले हे उसाचा रस विक्रेते धंदा करीत आहेत. १९६० सालापासून आजपर्यंत गेली ७४ वर्षापासून उसाचा रस विक्री करण्याचे सुरू आहे, असे नवनाथ रसवंतीगृहाचे मालक अमृत सोंडकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in