एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासून संताप व्यक्त

एकनाथ शिंदे समर्थक असा सामना रंगू लागला असून त्याचे पडसाद राज्यभर उमटण्यास सुरुवात झाली आहे.
 एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासून संताप व्यक्त

शिवसेना नेते, नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाविरोधात बंड करून विधिमंडळात आपला स्वत्रंत गट स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आता कट्टर शिवसैनिक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक असा सामना रंगू लागला असून त्याचे पडसाद राज्यभर उमटण्यास सुरुवात झाली आहे.

नवी मुंबईतदेखील शिवसेना उपशहरप्रमुख सतीश रामाणे यांनी शनिवारी सकाळी शिवसेना शाखा क्रमांक ९६ येथे असलेल्या बॅनरमधील एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासून आपला संताप व्यक्त केला. यांनी नेरुळमध्ये एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासून बंडखोर शिवसैनिकांविरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. नवी मुंबईत सर्वच ठिकाणी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यास सुरुवात केली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील अपक्ष आमदारांना घेऊन शिवसेना पक्षाविरोधात मोठे बंड पुकारले आणि शिवसेना नेतृत्वाला आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे खऱ्या शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात उघडपणे संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in