आठ लाखांची वीजचोरी पकडली; महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कामगिरी

महावितरणच्या नेरूळ उपविभागातील शाखा अभियंता आशिष इंगळे हे अनेक दिवसांपासून नेरूळमधील संशयित ग्राहकाच्या वीज वापरावर लक्ष ठेवून होते.
आठ लाखांची वीजचोरी पकडली; महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कामगिरी

नवी मुंबई : वीज चोरी पकडली जाऊ नये, यासाठी नेरूळमधील एका ग्राहकाने शक्कल लावून फोटो फ्रेमच्या मागे चेंजओव्हर स्विच दडवला होता; मात्र महावितरणच्या नेरूळ विभागातील कर्मचाऱ्यांनी दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर सदरचा स्विच शोधून काढत या ग्राहकाने चलाखीने केलेली वीज चोरी पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या ग्राहकाने सदर चेंजओव्हर स्विचच्या माध्यमातून ४ एसींचा वापर करून महावितरणची तब्बल ८ लाख २१ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

महावितरणच्या नेरूळ उपविभागातील शाखा अभियंता आशिष इंगळे हे अनेक दिवसांपासून नेरूळमधील संशयित ग्राहकाच्या वीज वापरावर लक्ष ठेवून होते. सदर बाब त्यांनी नेरूळ उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक बुधवंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी दोन पथके करावे गावामध्ये राहणाऱ्या संशयित ग्राहकाच्या घरी पाठवण्यात आले. यावेळी अभियंता अविनाश आभाळे, कृष्णात पाटील व सारिका अष्टनकर यांनी सागर पाटील, प्रवीण दानव व महिला कर्मचारी स्वाती लाड या टीमसोबत दीड तास प्रयत्नांची पराकाष्ठा करून सदर ग्राहकाने फोटो फ्रेमच्या मागील बाजूस दडवून ठेवलेला स्विच शोधून काढला. सदर ग्राहकाने या चेंज ओव्हर स्विचच्या त्यामाध्यमातून ४ एसींचा वापर केल्याचे आढळून आले.ज चोरी पकडली जाऊ नये, यासाठी नेरूळमधील एका ग्राहकाने शक्कल लावून फोटो फ्रेमच्या मागे चेंजओव्हर स्विच दडवला होता; मात्र महावितरणच्या नेरूळ विभागातील कर्मचाऱ्यांनी दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर सदरचा स्विच शोधून काढत या ग्राहकाने चलाखीने केलेली वीज चोरी पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या ग्राहकाने सदर चेंजओव्हर स्विचच्या माध्यमातून ४ एसींचा वापर करून महावितरणची तब्बल ८ लाख २१ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

महावितरणच्या नेरूळ उपविभागातील शाखा अभियंता आशिष इंगळे हे अनेक दिवसांपासून नेरूळमधील संशयित ग्राहकाच्या वीज वापरावर लक्ष ठेवून होते. सदर बाब त्यांनी नेरूळ उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक बुधवंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी दोन पथके करावे गावामध्ये राहणाऱ्या संशयित ग्राहकाच्या घरी पाठवण्यात आले. यावेळी अभियंता अविनाश आभाळे, कृष्णात पाटील व सारिका अष्टनकर यांनी सागर पाटील, प्रवीण दानव व महिला कर्मचारी स्वाती लाड या टीमसोबत दीड तास प्रयत्नांची पराकाष्ठा करून सदर ग्राहकाने फोटो फ्रेमच्या मागील बाजूस दडवून ठेवलेला स्विच शोधून काढला. सदर ग्राहकाने या चेंज ओव्हर स्विचच्या त्यामाध्यमातून ४ एसींचा वापर केल्याचे आढळून आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in