वुमन्स वॉकेथॉनला ऐरोलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद: हजारो महिलांचा सहभाग; नमो चषक २०२४ अंतर्गत आयोजन

सेक्टर १४ शिव राधा कृष्ण मंदिर येथून वॉकेथॉनचा शुभारंभ झाला. पारंपारिक वेशभूषेतही महिला सहभागी झाल्या होत्या.
वुमन्स वॉकेथॉनला ऐरोलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद: हजारो महिलांचा सहभाग; नमो चषक २०२४ अंतर्गत आयोजन

नवी मुंबई : नमो चषक २०२४ अंतर्गत १५०, ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित वुमन्स वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ऐरोलीमधील हजारो महिलांनी वॉकेथॉनमध्ये उत्साही सहभाग नोंदवून निरोगी आयुष्यासाठी खेळ खेळण्याचा संदेश दिला.

नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी हिरवा कंदील दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ केला, तर माजी खासदार संजीव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये या क्रीडा स्पर्धेची जल्लोषात सांगता झाली. भारतीय जनता पक्षाचे ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष अशोक पाटील, माजी नगरसेविका संगीता पाटील व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

सेक्टर १४ शिव राधा कृष्ण मंदिर येथून वॉकेथॉनचा शुभारंभ झाला. पारंपारिक वेशभूषेतही महिला सहभागी झाल्या होत्या. लेक व्ह्यू सोसायटी सेक्टर १४, गणपती मंदिर सेक्टर १५, अभ्युदय बँक वेलकम स्वीटसमोर अशाप्रकारे विविध भागात फिरून अडीच किलोमीटरची ही स्पर्धा सेक्टर १५ येथील चौकामध्ये संपन्न झाली. विजेत्या स्पर्धकाला सोन्याची नथ भेट देण्यात आली. ११ पैठण्यांची सोडत खास आकर्षण होते. सहभागी सर्व महिलांना विशेष भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

नवी मुंबईत नमो चषकासाठी एक लाखाहून अधिक नागरिकांची नोंदणी - जिल्हाध्यक्ष संदीप नाईक नवी मुंबईमध्ये नमो चषकाचे आयोजन विविध नोडमध्ये, विविध खेळ प्रकारांमध्ये आणि विविध वयोगटातल्या श्रेणीमध्ये करण्यात आल्याची माहिती यावेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली. ऐरोली मतदारसंघामध्ये जवळपास १ लाखांहून अधिक नागरिकांनी नमो चषकामध्ये नोंदणी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in