कामगार, व्यापारांसाठी व्यापारी-माथाडी बचाव कृती समितीची स्थापना

माथाडी कामगार आणि व्यापारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापारी व माथाडी बचाव कृती समितीची लवकरच स्थापना करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे
कामगार, व्यापारांसाठी व्यापारी-माथाडी बचाव कृती समितीची स्थापना

नवी मुंबई : माथाडी कामगार आणि व्यापारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापारी व माथाडी बचाव कृती समितीची लवकरच स्थापना करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवी मुंबईतील बाजारपेठांमधील माथाडी व व्यापारी वर्गाच्या विविध प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकारी यांची माथाडी भवन येथे ही बैठक झाली.

पणन संचालनालयाने परिपत्रक रद्द करणे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाढविणे,कोल्ड स्टोरेजमध्ये अनधिकृत व्यवसाय केला जात आहे तो थांबविणे, माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत घेणे, सल्लागार समिती व माथाडी बोर्डाच्या पुनर्रचना करणे या व व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या इतर न्याय्य प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात येणार आहे. समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास विधायक मार्गाने तीव्र आंदोलन करण्याची भूमिका कृती समितीच्या माध्यमातून घेतली जाईल, असा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केट, मसाला मार्केट, दाणाबंदर मार्केट, भाजीपाला व फळे मार्केटमधील व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी मोहन गुरनानी, शंकर पिंगळे, संजय पानसरे, चंद्रकांत ढोले, कैलास तांजणे, अशोक बढीया पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in