कळंबोली सर्कल हे मोठे वाहतूक बेट असल्याने याठिकाणी वाहनांची वर्दळ सुरू असते. एकत्र महामार्ग याठिकाणी येत असल्याने वाहतूककोंडी निर्माण होते. विशेषतः कामोठे एमजीएम समोर वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे पनवेलकरांसह इतरांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जंक्शन इम्प्रूवमेंट व्हावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यानुसार कळंबोली सर्कलचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे डिझाईन पूर्ण झाले आहे. एप्रिल महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून १२०० कोटी रुपयांच्या कामास सुरुवात केली जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.
पनवेल-उरण परिसरात असलेले विविध महत्वाकांक्षी प्रकल्प आणि त्या पार्श्वभूमीवर अत्यंत वर्दळीचे असलेले कळंबोली सर्कल विकसित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कळंबोली सर्कलचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून या आधी बैठक आयोजित केली होती. कळंबोली सर्कलच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमा, असा सल्ला नितीन गडकरी यांनी सिडको आणि इतर यंत्रणांना दिला होता. मुंबई, ठाणे, कल्याण -डोंबिवली तसेच पनवेल उरण जेएनपीटीकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते.
पनवेल- उरण ते मुंबई- ठाणे कडून ही वाहतूक जेएनपीटी कडे ये-जा होत असताना अवजड कंटेनर, प्रवासी वाहतूक कळंबोली एमजीएम सर्कल येथून चोवीस तास मार्गक्रमण करीत असते. कळंबोली सर्कल हे महत्त्वाचे जंक्शन आहे त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच कळंबोली मजीएम जंक्शन परिसरात भेडसावते. धीकधी तर तासनतास 'ट्रॅफिक जाम' होतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि वेळ वाया जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून पनवेलकरांची मुक्तता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमाने उड्डाणे घेऊ लागल्यानंतर मुंबईतील 'एअर ट्रॅफिक' कमी होईल, मात्र नवी मुंबईतील रस्त्यावरील कोंडी वाढू नये, या पार्श्वभूमीवर कळंबोली वाहतूक सर्कल विकसित करणे काळाची गरज होती. जेएनपीटी, सिडको आणि राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने एकत्र येऊन प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सीमाभागातील रस्ते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामधील पॅकेज ४ र्यंतची कामे पूर्ण झाली असून पॅकेज ५मध्ये कळंबोली सर्कल आणि विमानतळाच्या वहाळ बाजूकडील 'एग्झिट' वर रोटरी प्रकारचे चक्राकार बेट तयार करण्याचे प्रस्तावित आहे. सध्या असलेल्या सल्लागारासोबत आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार घेऊन पुढील २० वर्षे पुन्हा नूतनीकरणाची गरज लागणार नाही, असे नियोजन करण्याचा सल्ला गडकरी यांनी अधिकाऱ्यांना या आधीच ला आहे.
रोटरी प्रकारचे सर्कल
जेएनपीटी बंदराकडे जाणारी अवजड वाहतूक, विमानतळावरून थेट पुण्याकडे जाणारी वाहतूक एकमेकांना अडथळा न करता थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर जाता येईल, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'रोटरी' प्रकारचे सर्कल विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.