नवी मुंबईत अपघाताचे सत्र पाच जणांचा झाला मृत्यु

नवी मुंबईत अपघाताचे सत्र पाच जणांचा झाला मृत्यु
Published on

नवी मुंबईत अपघाताचे सत्र सुरूच असून मंगळवारी पहाटे सायन-पनवेल मार्गावर खारघर येथे रस्ता दुभाजकावर इनोव्हा कार धडकून चालकाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत गत चार दिवसांत घडलेला हा पाचवा अपघात असून या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी झाला आहे.

या अपघातातील मृत करचालकाचे नाव प्रमोद परशुराम गायकवाड असे असून तो खारघर सेक्टर-दाेन मध्ये लिटिल वर्ल्ड मॉल जवळ राहत होता. प्रमोद गायकवाड हा मंगळवारी पहाटे बेलापूर येथून कारने खारघर येथे जात होता. त्याची कार हिरानंदानी ब्रीज जवळ आली असताना, प्रमोदचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याची कार तेथील ब्रीजच्या दगडी रस्ता दुभाजकावर धडकून पलटी झाली. या अपघातात प्रमोद गायकवाड गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. मृत प्रमोद गायकवाड याने निष्काळजीपणे भरधाव वेगाने इनोव्हा कार चालवून नेल्याने सदरचा अपघात झाल्याचे आढळून आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in