गांजा विक्री करणाऱ्या तीन महिलांसह चार अटकेत

कोपरखैरणे सेक्टर-९ मधील बालाजी एक्झॉटिका बिल्डिंगसमोरील झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
गांजा विक्री करणाऱ्या तीन महिलांसह चार अटकेत

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी कोपरखैरणेतील बालाजी एक्झॉटिका बिल्डिंगसमोरील झोपडपट्टीत कोम्बिंग ऑपरेशन करत गांजा विक्री करणाऱ्या ३ महिलांसह चौघांची धरपकड केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ६३ हजार रुपये किमतीचा २० किलो २०० ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ जप्त केला आहे.

कोपरखैरणे सेक्टर-९ मधील बालाजी एक्झॉटिका बिल्डिंगसमोरील झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या अधारे कोपरखैरणे पोलिसांनी ७ फेब्रुवारी रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या ऑपरेशनदरम्यान पोलिसांना अनिल शिंदे (४५), रादुबाई काळे (४०), सीमा पवार (३३) आणि सुरेखा शिंदे (३०) हे चारजण स्वत:च्या फायद्यासाठी गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याच्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी या चौघांकडून तब्बल ३ लाख ६३ हजार ६०० रुपये किमतीचा २० किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या चौघांविरोधात एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने या चौघांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या आरोपींनी सदरचा अमली पदार्थ कोठून आणला आहे, याचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे. औदुंबर पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरखैरणे पोलीस ठाणे)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in