अमली पदार्थाची तस्करी करणारे चौघे अटकेत; २२ लाख ८० हजार रुपये किमतीचे एलएसडी पेपर जप्त

उलवे येथील वहाळ गाव येथील तलावाजळ एक तरुण एलएसडी पेपर या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हिमांशु प्रजापती (१९) हा तरुण संशयास्पदरीत्या आला असता, अमली पदार्थविरोधी पथकाने त्याची धरपकड केली.
अमली पदार्थाची तस्करी करणारे चौघे अटकेत; २२ लाख ८० हजार रुपये किमतीचे एलएसडी पेपर जप्त
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई परिसरात एलएसडी पेपर या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चौघांना अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी या चौघांकडून तब्बल २२ लाख ८० हजार रुपये किमतीचे एलएसडी पेपर हस्तगत केले आहेत.

उलवे येथील वहाळ गाव येथील तलावाजळ एक तरुण एलएसडी पेपर या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हिमांशु प्रजापती (१९) हा तरुण संशयास्पदरीत्या आला असता, अमली पदार्थविरोधी पथकाने त्याची धरपकड केली. यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ १० लाख रुपये किमतीचे ५० एलएसडी पेपर आढळून आले. याबाबत चौकशी केली असता, त्याला विजय शिर्केने (२३) एलएसडी पेपर दिल्याचे समोर आले. विजय शिर्केला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता सिद्धेश चव्हाण (२५) याचे नाव नव्याने समोर आले. सिद्धेशने आदर्श सुब्रमण्यमचे (२२) नाव सांगितले. त्यानंतर आदर्श सुब्रमण्यमला ताब्यात घेऊन त्याच्याकडील ६४ एलएसडी पेपर हस्तगत केले. अमली पदार्थविरोधी पथकाने या कारवाईत तब्बल २२ लाख ८० हजार रुपये किमतीचे एलएसडी पेपर जप्त केले आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्यांपैकी हिमांशु, विजय आणि सिद्धेश हे तिघेही तरुण उच्च शिक्षण घेत असल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच आदर्श सुब्रमण्यम हा एलएसडी पेपरचा नवी मुंबईतील मुख्य पुरवठादार असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. आदर्श हा महाविद्यालयीन तरुणांच्या माध्यमातून अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

-निरज चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - अमली पदार्थविरोधी कक्ष

logo
marathi.freepressjournal.in