सौदीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

हा प्रकार भांडुप येथे राहणाऱ्या दोन युवकांच्या बाबतीत घडला आहे.
सौदीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

नवी मुंबई : भांडुप येथे राहणाऱ्या बेरोजगार युवकास सौदी येथे नोकरीचे आमिष दाखवून त्याला इराणमध्ये पाठवले; मात्र तिथेही चार महिने राहूनही नोकरी न मिळाल्याने परत यावे लागले. हा प्रकार भांडुप येथे राहणाऱ्या दोन युवकांच्या बाबतीत घडला आहे. त्यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, यात शेकडो बेरोजगारांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुष्कर सोनार, संग्राम सोंडगे, आणि निरंजन देशमुख असे यातील आरोपींची नावे आहेत. तर साहिल घोरपडे यांनी तक्रार दिलेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in