फ्यूजन सीएक्सचे नवीन जागतिक केंद्र; पुढील तीन महिन्यांत ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची कंपनीची घोषणा

जागतिक पातळीवर अग्रणी असलेल्या फ्यूजन या बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) आणि कस्टमर एक्स्पेरिअन्स (सीएक्स) सोल्यूशन्स कंपनीने नवी मुंबईतील महापे येथे नवीन केंद्राचा शुभारंभ केला आहे.
फ्यूजन सीएक्सचे नवीन जागतिक केंद्र; पुढील तीन महिन्यांत ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची कंपनीची घोषणा

नवी मुंबई : जागतिक पातळीवर अग्रणी असलेल्या फ्यूजन या बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) आणि कस्टमर एक्स्पेरिअन्स (सीएक्स) सोल्यूशन्स कंपनीने नवी मुंबईतील महापे येथे नवीन केंद्राचा शुभारंभ केला आहे. फ्युजनच्या या नवीन केंद्रामध्ये येत्या तीन महिन्यांमध्ये ५०० हून अधिक तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कंपनीची भारतातील कर्मचारीवर्गाची संख्या १० हजार पेक्षा अधिक होणार आहे.

फ्युजन सीएक्स ही बीपीएम व सीएक्स सोल्यूशन्समधील जागतिक अग्रणी कंपनी असून, या कंपनीचे अमेरिका, लॅटम, ईएमईए आणि आग्नेय आशियामधील विविध शहरांमध्ये १४ हजारहून अधिक टीम सदस्य कार्यरत आहेत. या कंपनीने आता नवी मुंबईतील महापे येथे नवीन जागतीक केंद्र सुरू केले आहे. प्रगत तंत्रज्ञानासह सुसज्ज असलेल्या फ्युजनच्या या नवीन केंद्राचे उद्घाटन हेल्थकेअर अँड लाइफ सायन्सेस एसबीयूचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि एपीएसी ऑपरेशन्सचे प्रमुख अमिताभ वर्तक यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी फ्युजनचे संचालक व सह-संस्थापक किशोर सरोगी उपस्थित होते.

नवी मुंबईतील या केंद्राची सुरुवात महत्त्वपूर्ण टप्पा असून, भारतातील बाजारपेठेमधील फ्युजनची सातत्यपूर्ण वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पुढील तीन महिन्यात ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची कंपनीची योजना आहे. त्यामुळे भारतातील त्यांच्या कर्मचारीवर्गाची संख्या १० हजार पेक्षा अधिक होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in