अग्निशमन केंद्रात जुगार; ५ कर्मचारी निलंबित

निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सचिन शिंदे, अक्षय सिसोदे, विनोद देठे, विनोद गायकवाड, हेमंत भरसट यांचा समावेश आहे
अग्निशमन केंद्रात जुगार; ५ कर्मचारी निलंबित

नवी मुंबई : मद्य प्राशन करून जुगार खेळल्याच्या आरोपाप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे अग्निशमन केंद्रातील ५ अग्निशमन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे अग्निशमन केंद्रातील ५ अग्निशमन कर्मचारी कामावर असतांना मद्य प्राशन करून जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित झाला होता. याची नोंद घेत प्रशासन विभागाने संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच त्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी याविषयी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने तो अमान्य करत करण्यात आला. तसेच त्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी ही प्रस्तावित करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये सदर कर्मचाऱ्यांनी असा प्रकार केला होता की नाही, हे निष्पन्न होणार आहे. निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सचिन शिंदे, अक्षय सिसोदे, विनोद देठे, विनोद गायकवाड, हेमंत भरसट यांचा समावेश आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in