नेरूळमध्ये गुंड चिराग लोकेची हत्या, चिरागची पत्नी गंभीर जखमी

पाच हल्लेखोरांनी नेरूळ सेक्टर-२० मध्ये राहणाऱ्या गुंड चिराग महेश लोके (३०) याची हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
नेरूळमध्ये गुंड चिराग लोकेची हत्या, चिरागची पत्नी गंभीर जखमी

नवी मुंबई : माथाडीच्या साईटवरून झालेल्या वादातून पाच हल्लेखोरांनी नेरूळ सेक्टर-२० मध्ये राहणाऱ्या गुंड चिराग महेश लोके (३०) याची हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या हल्ल्या लोके याची पत्नी प्रियंका लोके (२८) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेतील मृत चिराग लोके हा नेरूळ सेक्टर-२० मध्ये राहत होता. तसेच तो अरुण गवळी व शरद मोहोळ या टोळीसाठी काम करत होता. चिराग लोकेची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून नेरूळ पोलिसांनी त्याच्यावर काही दिवसांपूर्वी मोक्कांतर्गत कारवाई केली होती. मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास चिराग लोके व त्याची पत्नी हे दोघे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना आरोपी अरविंद सोडा व त्याच्या साथीदारांनी त्याला अडवून लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्याची पत्नी प्रियंका त्याला वाचवण्यासाठी गेली असता, हल्लेखोरांनी तिच्यावर देखील लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला करून पलायन केले. या हल्ल्यात चिरागचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाली असून तीच्यावर डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी आरोपी आरोपी अरविंद रामनाथ सोडा, अरबाज, पगला, शेरा व इतर दोन अशा एकूण पाच मारेकऱ्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, मृत चिराग महेश लोके व आरोपी अरविंद रामनाथ सोडा हे दोघे एकाच जेलमध्ये होते. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद डोसा व चिराग यांच्यामध्ये मानखुर्द येथे असलेल्या माथाडी साईटवरून वाद सुरू होता. याच वादातून गत ९ फेब्रुवारी रोजी चिराग व त्याची पत्नी प्रियांका या दोघांना काही गुंडांनी माथाडी साईटच्या वादातून धमकावले देखील होते.

logo
marathi.freepressjournal.in