उरण-बेलापूर रेल्वे मार्गासाठी फाटक बंद होणार

उरण-बेलापूर रेल्वे मार्गासाठी फाटक बंद होणार

उरण-सीवूड्स रेल्वेच्या कामाने उरण तालुक्यात सध्या गती घेतली असून यामुळे नवघर गावाजवळील रेल्वे फाटक कायम स्वरूपी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नवघर, कुंडेगाव, पागोटे येथील नागरिकांना आत्ता वळसा घालून प्रवास करावा लागणार असल्याने येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी रेल्वेने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

या रेल्वे फाटकाशी येथील नागरिकांचे एक भावनिक नाते आहे. माजी खासदार दि.बा.पाटील यांच्या नेतृत्त्वात १९८४ला झालेल्या शेतकरी आंदोलनात याच रेल्वे फाटकाजवळ तीन शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले होते. आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पागोटे गावातील तीन शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले होते. त्यामुळे आजही हे रेल्वे फाटक येथील ग्रामस्थांसाठी अभिमानाची वास्तू आहे. मात्र उरण ते बेलापूर दरम्यान सुरू होत असलेल्या प्रवासी रेल्वे मार्गासाठी हे फाटक वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील प्रवाशांना नवघर उड्डाणपुलावरून प्रवास करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in