भरधाव बाईकवरून मैत्रिण पडली, मृत्यू झाला; पोलिसांनी मित्राविरोधात गुन्हा दाखल केला

मित्राने भरधाव वेगात दुचाकी नेल्याने पाठीमागे बसलेली तरुणी खाली पडून तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.
भरधाव बाईकवरून मैत्रिण पडली, मृत्यू झाला; पोलिसांनी मित्राविरोधात गुन्हा दाखल केला

नवी मुंबई : मित्रासोबत दुचाकीवरून घरी जात असलेल्या तरुणीचा रस्त्यावर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेतील मृत तरुणीच्या मित्राने भरधाव वेगात दुचाकी नेल्याने पाठीमागे बसलेली तरुणी खाली पडून तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी या अपघाताला जबाबदार धरून मृत तरुणीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या अपघातात मृत झालेल्या तरुणीचे नाव शैफिता मुस्ताक खान (वय २३) असे असून ती कल्याण-पलावा येथील मारवेला सोसायटीत राहत होती. शैफिता ही चेंबूर येथील आयटी कंपनीत काम करत होती. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शैफिता ही सुफियान सलीम कुरेशी (वय २८) याच्यासोबत त्याच्या दुचाकीवरून आपल्या घरी परतत होती. या वेळी त्यांची दुचाकी तळोजा एमआयडीसीतील नावडे फाटा कल्याण रोडवरील महानगर गॅस पंपाजवळ आली असताना शैफिताचा तोल गेल्याने ती दुचाकीवरून खाली पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत होऊन ती गंभीर जखमी झाली. या वेळी तिला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in