इन्स्टाग्रामवरील रील पाहून चोरी; ‘लाल स्टिकर'वरून पोलिसांनी चोरांच्या आवळल्या मुसक्या

इन्स्टाग्रामवरील साखळी चोरीची रील पाहून त्यापासून प्रेरणा घेत रबाळे येथील चोरांनी एका महिलेच्या गळ्यातील साखळी चोरी केली.
इन्स्टाग्रामवरील रील पाहून चोरी; ‘लाल स्टिकर'वरून पोलिसांनी चोरांच्या आवळल्या मुसक्या

नवी मुंबई : इन्स्टाग्रामवरील साखळी चोरीची रील पाहून त्यापासून प्रेरणा घेत रबाळे येथील चोरांनी एका महिलेच्या गळ्यातील साखळी चोरी केली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्या रिक्षाला ‘लाल स्टिकर' लावले होते, एवढ्याच माहिती वरून चोरांचा ठिकाणा शोधत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना अटक केल्यावर अन्य सहा गुन्ह्यांची उकल देखील करण्यात पोलिसांना यश आले आहे.

किसन तेजबहादुर थलारी आणि मोसिन मसुद खान असे अटक आरोपींची नावे आहेत. ऐरोली येथे राहणाऱ्या सीमा मिश्रा या ९ फेब्रुवारीला ऐरोली सेक्टर १७ सह्याद्री अपार्टमेंट या ठिकाणी उभ्या होत्या. काही वेळाने त्या ठिकाणी एक रिक्षा आली. रिक्षात पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांना गणेश मंडी कुठे आहे? अशी विचारणा केली. गणेश मंडी बाबत काही विचार करत असताना अचानक पत्ता विचारणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील एक ग्रॅम वजनाची साखळी हिसकावून पळून गेले. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र आरोपींची ओळख पटावी, अशी कुठलीही खून फिर्यादी सीमा यांना आठवत नव्हती; मात्र प्रयत्न केल्यावर ज्या रिक्षात बसून आरोपी आले होते, त्या रिक्षाच्या मागे एक लाल रंगाचे स्टिकर लावलेले त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी असे लाल रंगाचा पटटा असलेल्या रिक्षाचा शोध सुरू केला. २४ तारखेला ज्या रिक्षाचा शोध घेत होते ती रिक्षा रात्री आठच्या सुमारास रबाळे एमआयडिसीतील भूषण बारपासून एमआयइसी अंतर्गत भागात जाताना आढळून आली.

logo
marathi.freepressjournal.in