मेट्रो स्थानकातून १ लाखापेक्षा अधिक किमतीचे सामान लंपास

खारघर पोलिसांनी या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
मेट्रो स्थानकातून १ लाखापेक्षा अधिक किमतीचे सामान लंपास
Published on

नवी मुंबई : अज्ञात चोरट्याने बेलपाडा मेट्रो स्टेशनच्या आवारातील पंप रूममध्ये ठेवलेली जनरेटरची बॅटरी, फायर यार्ड, मॅटेलिक हायड्रेंट कनेक्टर तसेच लोखंडी पाइप व बाथरूमचे नळ असा सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे सामान चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. खारघर पोलिसांनी या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

गत १४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बेलापूर-पेंधर या मेट्रो मार्गावरील बेलपाडा मेट्रो स्टेशनच्या बंदिस्त आवारात घुसून तेथीळ पंप रूममध्ये ठेवण्यात आलेली जनरेटरची बॅटरी, फायर यार्ड मॅटेलिक हायड्रेंट कनेक्टर तसेच लोखंडी पाइप व बाथरूमचे नळ असा सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्या. सकाळी ७ वाजता दिवसपाळीवर कामावर आलेल्या सुरक्षारक्षकांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. याबाबत महा मेट्रो कंपनीतील सिक्युरिटी सुपरवायजरने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in