कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ प्रतिबंध कायदा विषयक मार्गदर्शन

स्त्री शक्तीची ताकद मोठी असून, महिलांनी आपले वर्तुळ आता स्वत:च आखायचे असून, खंबीरपणे नाही म्हणायला शिकायचे आहे
कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ प्रतिबंध कायदा विषयक मार्गदर्शन
Published on

नवी मुंबई : स्त्री शक्तीची ताकद मोठी असून, महिलांनी आपले वर्तुळ आता स्वत:च आखायचे असून, खंबीरपणे नाही म्हणायला शिकायचे आहे, असे सांगत जिल्हा न्यायाधीश एस एस जैन यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधात्मक कायदा २०१३ मधील मार्गदर्शक तत्वांबाबत सुसंवाद साधला. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश एक कार्यालयाच्या वतीने आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधात्म्क कायदा २०१३ बाबत जनजागृतीपर मार्गदर्शन शिबीराप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विधी विभागाचे विभाग प्रमुख उपआयुक्त दिलीप नेरकर, भांडार विभागाच्या उपआयुक्त मंगला माळवे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षण अधिकारी अरुणा यादव, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in