नवी मुंबईत १० लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त

सदर गुटख्याचा साठा या दोघांनी कुठून आणला याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
नवी मुंबईत  १० लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त

नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गत शनिवारी तळोजा सेक्टर-९ भागातील एका गाळ्यावर छापा मारुन सुमारे ९ लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा व सव्वा लाखाची रोख रक्कम जप्त केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा करुन ठेवणाऱया महमद हमजा महमद शाहिद खान (२६) आणि अरफान सिराज अहमद शेख (२२) या दोघांना अटक केली आहे. सदर गुटख्याचा साठा या दोघांनी कुठून आणला याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

तळोजा फेज-१,सेक्टर-९ मधील अंम्मार रेसिडेन्सी या इमारतीतील गाळा नंबर-३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीचा प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखु व सुगंधी सुपारी विक्री करण्यासाठी साठवुन ठेवण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीत आली सय्यद, पोलीस उप निरीक्षक विजय शिंगे व त्यांच्या पथकाने सायंकाळी तळोजा फेज-१,सेक्टर-९ मधील अंम्मार रेसिडेन्सी या इमारतीतील गाळा नंबर-३ वर छापा मारला.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर गाळ्यातून सुमारे ९ लाख रुपये किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा प्रतीबंधीत पानमसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा तसेच १ लाख २६ हजाराची रोख रक्कम असा एकुण २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in