नवी मुंबईत किराणा मालाच्या दुकानातुन गुटख्याचा साठा जप्त

नवी मुंबईत किराणा मालाच्या दुकानातुन गुटख्याचा साठा जप्त

नवी मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने दिघा आंबेडकर नगरमधील एका दुकानावर छापा मारुन सुमारे पाऊण लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा करणाऱ्या विलास उत्तम कटके याला अटक केली आहे. सदर गुटख्याचा साठा त्याने कुठून आणला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेला विलास कटके हा दिघा आंबेडकर नगर मधील संतोषी माता चाळीत राहत होता. तसेच तो त्याचठिकाणी किराणा मालाचे दुकान चालवत होता. कटके हा आपल्या दुकानातून किराणा मालाची विक्री करतानाच तो गुटखा छुप्या पद्धतीने विक्री करत होता. याबाबतची माहिती अमलीपदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर सदर बुधवारी दुपारी दिघा येथील कटके याच्या दुकानावर छापा मारला. त्याच्या दुकानात गुटखा व सुगंधी तंबाखू ठेवण्यात आल्याची माहिती विचारली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी सदर दुकान व त्याच्या घराची तपासी केली असता, त्याच्या दुकानात सुमारे पाऊण लाख रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचे पाकिटे व सुगंधित सुपारीचा माल असल्याचे आढळून आले. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुटख्याचा साठा जप्त करुन कटके याच्यावर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in