किराणामालाच्या दुकानातून २ लाख १८ हजारांचा गुटखा जप्त

घोटगावात धडक देऊन आतिफ खान याच्या रॉयल जनरल स्टोअर्स या दुकानावर छापा मारला.
किराणामालाच्या दुकानातून २ लाख १८ हजारांचा गुटखा जप्त

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने मंगळवारी रात्री तळोजा भागात दोन किराणामालाच्या दुकानावर छापे मारून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला २ लाख १८ हजार रुपये किमतीचा गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा तसेच ४ लाख रुपये किमतीची इको कार जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा बाळगणाऱ्या दोन्ही व्यक्तींना अटक केली आहे.

तळोजा येथील तोंडरे गावातील खुशी किराणा स्टोअर्स या दुकानातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूची साठवणूक करून त्याची छुप्या पद्धतीने विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-३ ला मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने दुकानमालक देवेंद्र ओंकार त्रिपाठी (३८) याच्याकडे इतर साठ्याबाबत चौकशी केली असता, प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गुन्हे शाखेने सदर कारची तपासणी केली असता, त्यात २ लाख ६६ हजार रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूने भरलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्या.

घोटगावात धडक देऊन आतिफ खान याच्या रॉयल जनरल स्टोअर्स या दुकानावर छापा मारला. यावेळी सदर दुकानात सुमारे ५२ हजार रुपये किमतीचा गुटखा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्याचा साठा विक्रीकरीता बाळगल्याप्रकरणी अतिफ मोहम्मद खालीद खान (३२) व देवेंद्र ओंकार त्रिपाठी (३८) या दोघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in