यशश्री शिंदेच्या आरोपीला फाशी द्या; हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा; पेणमध्ये मूक मोर्चा

उरण येथील यशश्री शिंदेच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फासावर लटकवा...
यशश्री शिंदेच्या आरोपीला फाशी द्या; हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा; पेणमध्ये मूक मोर्चा
Published on

पेण : उरण येथील यशश्री शिंदेच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फासावर लटकवा, अशी मागणी यशश्री शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ पेण येथे आयोजित मूक मोर्चात करण्यात आली.

उरण येथील तरुणी यशश्री शिंदेची क्रूरतेने हत्या करण्यात आली, या हत्येच्या निषेधार्थ सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून पेण शहरात मूक मोर्चाची हाक देण्यात आली होती. या मूक मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे मावळे आणि विविध प्रकारच्या सामाजिक संघटनांचे सदस्य आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता काळे कपडे परिधान करून, तोंडाला काळे मास्क लावून आणि हाताला काळ्या फिती लावून मूक मोर्चा महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय, नगर पालिका चौक, बाजारपेठ मार्गाने पेण पोलीस ठाण्यापर्यंत नेण्यात आला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना निवेदन देऊन केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी केली.

logo
marathi.freepressjournal.in