कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरअभावी रुग्णांची गैरसोय; स्थानिकांचे हाल

ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयात रात्रभर डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरअभावी रुग्णांची गैरसोय; स्थानिकांचे हाल

उरण : ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयात रात्रभर डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सदर रुग्णालयाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील जनता व्यक्त करत आहे.

उरण परिसरातील गरीब, गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र अशी सध्या दोन उपचार केंद्र आहेत. ३० खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर अवघ्या तालुक्याचा भार आहे. दररोज २५० बाह्यरुग्णांची वर्दळ असलेल्या ग्रामीण रुग्णालयावर इतर अनेक कामांचा वाढता ताण आहे.

या उलट ग्रामीण भागात असलेले कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे उरण परिसरातील विशेषता ग्रामीण भागातील गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आश्रयाला ये-जा करत आहेत.

स्थानिकांचे हाल

ग्रामीण भागातील गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ये-जा करत असताना रात्री सात वाजल्यानंतर या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर थांबत नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करत पनवेल, नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in