देशातील पहिले सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर स्थापन; राज्य सहकारी बँकेने उचलले महत्त्वपूर्ण पाऊल

भारतीय सहकारी बँकिंग क्षेत्रात सायबर सुरक्षेच्या दिशेनेएक महत्त्वाचे पाऊल उचलत, राज्य सहकारी बँकेने देशातील पहिले सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (C-SOC) स्थापन करण्यात आले आहे. वाशी येथील स्वत:च्या जागेत सहकार सुरक्षा या नावाने सुमारे ५० कोटींच्या भांडवली गुंतवणुकीतून हे आधुनिक आणि सुसज्ज केंद्र उभारण्यात आले आल्याची माहिती राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
देशातील पहिले सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर स्थापन; राज्य सहकारी बँकेने उचलले महत्त्वपूर्ण पाऊल
Published on

नवी मुंबई : भारतीय सहकारी बँकिंग क्षेत्रात सायबर सुरक्षेच्या दिशेनेएक महत्त्वाचे पाऊल उचलत, राज्य सहकारी बँकेने देशातील पहिले सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (C-SOC) स्थापन करण्यात आले आहे. वाशी येथील स्वत:च्या जागेत सहकार सुरक्षा या नावाने सुमारे ५० कोटींच्या भांडवली गुंतवणुकीतून हे आधुनिक आणि सुसज्ज केंद्र उभारण्यात आले आल्याची माहिती राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

सायबर हल्ल्यांची वाढती तीव्रता आणि नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी बँकांनी पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या संदर्भात राज्य सहकारी बँकेने उचललेले पाऊल महत्त्वपूर्ण ठरले आहे.

सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स केंद्राचे लोकार्पण येत्या १३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. वाशीतील कार्यालयात सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची उभारणी केली आहे. हे सेंटर उभे करण्यापूर्वी विदेशात ही प्रणाली कशी काम करते याचा अभ्यास दौरा आयोजित करून सर्व माहिती घेण्यात आली.

या केंद्रामध्ये राज्य सहकारी बँकेचे सुमारे ३५ तांत्रिक कर्मचारी २४०७ वेळ कार्यरत आहेत. सहकार क्षेत्राच्या मागणीनुसार या केंद्राची क्षमता वाढविण्याचे राज्य बँकेने निश्चित केले आहे.

या केंद्राच्या माध्यमातून राज्य बँक सदस्य बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सायबर सिक्युरिटी केंद्राची मुख्य वैशिष्ट्ये व उद्दिष्टे

  • राज्य बँक व इतर सहकारी बँकांना सायबर हल्ल्यांपासून संरक्षण

  • एआय फ्लॅटफॉर्मद्वारे धोका ओळखून तत्काळ सतर्क करणे

  • सायबर हल्ल्यांचे प्रारंभीच निदान व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे

  • बँकांच्या सुरक्षेची मोजणी व धोरणात्मक मार्गदर्शन करणे.

  • चोवीस तास बँकांच्या संगणकीय व्यवस्थेवर लक्ष ठेवून संभाव्य धोक्याची सूचना देणार

या केंद्रामध्ये राज्य सरकारी बँकेचे ३५ तांत्रिक कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. भविष्यात सहकारी क्षेत्राच्या गरजेनुसार याची क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे. यासोबतच राज्य बँकेच्या सदस्य बँकांसाठी सायबर सिक्युरिटी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. राज्य सहकारी बँकेने हा प्रकल्प नफा न घेता सर्व सहकारी बँकांना व पतसंस्थांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, यामागे सहकारात सहकार हे तत्व आहे. डिजिटल बँकिंग आणि एआय युगाच्या दृष्टीने हे पाऊल संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. - विद्याधर अनास्कर, चेअरमन राज्य सहकारी बँक

logo
marathi.freepressjournal.in