एपीएमसी मार्केटमध्ये देशी सफरचंदांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली

आतापर्यंत २०० रुपये किलोच्या घरात असलेले सफरचंदाचे दर यामुळे आता अगदी १०० रुपयांपर्यंत आले आहेत
एपीएमसी मार्केटमध्ये  देशी सफरचंदांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली
Published on

नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये विविध फळांची आवक सुरु झाली आहे. यामध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशी सफरचंदांची आवक वाढली असून बाजारात मोठ्या प्रमाणात देशी सफरचंदाची उपलब्ध आहेत.

ऑगस्ट महिन्यापासून देशी सफरचंदांचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर मुंबईच्या बाजारात त्यांची आवक होण्यास सुरुवात होते. मात्र यावेळी जुलैमध्येच वाशीच्या घाऊक बाजारात देशी सफरचंद दिसत आहेत. आतापर्यंत २०० रुपये किलोच्या घरात असलेले सफरचंदाचे दर यामुळे आता अगदी १०० रुपयांपर्यंत आले आहेत. बहुगुणी सफरचंद आजारी व्यक्तींसाठी, लहान मुलांसाठी वरदानच असते. बाजारात पूर्ण वर्षभर ही फळे दिसत असली, तरी वर्षातील आठ महिने परदेशातील सफरचंद बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांचे दर वर्षभर चढेच असतात. मात्र ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत भारतीय सफरचंदांचा हंगाम असल्याने, या काळात देशातून मोठ्या प्रमाणात सफरचंदे मुंबईच्या बाजारात उपलब्ध होतात.

logo
marathi.freepressjournal.in