भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान;शिवसेनेची जोरदार निदर्शन

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात निर्देशने करण्यात आली
 भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान;शिवसेनेची जोरदार निदर्शन
Published on

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने वाशी येथील शिवाजी महाराज चौकात आज जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने सर्व परिसर दणाणून गेला.

शिवसेना नवीमुंबई शाखेच्या वतीने शनिवारी सायंकाळी चार वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात निर्देशने करण्यात आली. हे आंदोलन जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छेडण्यात आले. या आंदोलनात जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, संतोष घोसाळकर, मिलिंद सुर्यराव, शहरप्रमुख विजय माने, उपजिल्हासंघटक उषा रेणके, आरती शिंदे, निशा पवार, उपशहरप्रमुख जितेंद्र कांबळी, एकनाथ दुखंडे, सोमनाथ वास्कर, समीर बागवान, महेश कोटीवाले, श्रीकांत भोईर, विशाल विचारे, काशिनाथ पवार, शत्रुघ्न पाटील, संतोष मोरे, संतोष दळवी, संदीप पवार, नितीन जाधव, अमित भूमकर, प्रणाली कदम, संदीप पाटील, सदाशिव मनगुटकर, जयवंत भोईर आदी सहभागी झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in