उलवे परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेला इसम अटकेत

पोलिसांनी त्याच्याकडे विचारपुस करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला
उलवे परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेला इसम अटकेत
Published on

नवी मुंबई : उलवे नोड मधील वहाळ गाव तलावाजवळ गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. के. आर. जेम्स (६०) असे या इसमाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला सुमारे १८ हजार रुपये किमतीचा १ किलो ११० ग्रॅम गांजा जफ्त केला आहे. या व्यक्तीने सदरचा गांजा कुठून आणला याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

एनआरआय पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक वऱ्हाडी व त्यांचे पथक गत गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास उलवे नोडमध्ये गस्त घालत होते. यावेळी वहाळ गाव तलावाजवळ सेक्टर-२३ मध्ये के. आर. जेम्स हा व्यक्ती हातामध्ये पिशवी घेऊन संशयास्पदरित्या फिरताना गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आला. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे विचारपुस करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला पकडुन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेल्या पिशवीची तपासणी केली असता, त्यात गांजा हा अमली पदार्थ असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याला अटक करून त्याच्याजवळ सापडलेला सुमारे १८ हजार रुपये किमतीचा १ किलो ११० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in