अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणारे जेरबंद

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पीडित मुलीची सुटका केली. तसेच पीडित मुलीला वेश्याव्यवसासाठी लावणाऱ्या तिघांना अटक केली.
अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणारे जेरबंद

नवी मुंबई : बांगलादेशातून १४ वर्षीय मुलीला फूस लावून भारतात पळवून आणून तिच्याकडून वेश्याव्यसाय करून घेणाऱ्या दाम्पत्य व एक दलाल अशा तिघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तळोजा येथील एका फ्लॅटवर छापा मारून अटक केली आहे. तसेच या त्रिकुटाने वेश्याव्यसायासाठी लावलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

तळोजा फेज-१ मधील ऐव्हर शाईन सोसायटीत राहणारे दाम्पत्य १४ ते १५ वयोगटातील मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती.

सदर माहितीच्या आधारे मोहिनुर इस्माइल मंडल (३७) व त्याची पत्नी मोहिनी ऊर्फ डॉली मोहिनूर मंडल (२७) दलाल समोन धातुन शेख (२७) तिघेही भाड्याने घेतलेल्या सदर फ्लॅटमध्ये बांगलादेशातून फूस लावून पळवून आणण्यात आलेल्या १४ वर्षे ४ महिन्यांच्या मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेताना आढळून आले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पीडित मुलीची सुटका केली. तसेच पीडित मुलीला वेश्याव्यवसासाठी लावणाऱ्या तिघांना अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in