जेएनपीए बंदरात पाकिस्तानी वस्तू जप्त; दोघांना अटक

जेएनपीए (न्हावा शेवा) बंदरात महसूल गुप्तचर संचालनालयाने १२ कोटी रुपये किमतीचे पाकिस्तान उत्पादीत वस्तू, फळांचे २८ कंटेनर जप्त केले आहेत. या कंटेनर्समध्ये ८०० मेट्रिक टन सुके खजूर आणि सौंदर्यप्रसाधने होती. या प्रकरणी दुबईस्थित पुरवठादार आणि एका कस्टम ब्रोकरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
जेएनपीए बंदरात पाकिस्तानी वस्तू जप्त; दोघांना अटक
Published on

उरण : जेएनपीए (न्हावा शेवा) बंदरात महसूल गुप्तचर संचालनालयाने १२ कोटी रुपये किमतीचे पाकिस्तान उत्पादीत वस्तू, फळांचे २८ कंटेनर जप्त केले आहेत. या कंटेनर्समध्ये ८०० मेट्रिक टन सुके खजूर आणि सौंदर्यप्रसाधने होती. या प्रकरणी दुबईस्थित पुरवठादार आणि एका कस्टम ब्रोकरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने २ मे २०२५ रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आयातबंदी घातली होती. या निर्णयानंतर जुलैमध्ये ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट सुरू करण्यात आले. या ऑपरेशनचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. आयातबंदी टाळण्यासाठी अनेक सिंडिकेट्स बनावट मूळ-देश प्रमाणपत्रे आणि चुकीच्या शिपिंग कागदपत्रांचा वापर करत असल्याचे या तपासणीत आढळले आहे.

डीआरआयच्या तपासानुसार, जप्त करण्यात आलेली सौंदर्यप्रसाधने आणि खजूर जेबेल अली पोर्ट, दुबईमार्गे भारतात आणले गेले होते. मूळात ही उत्पादने पाकिस्तानची असूनही, ती यूएई-निर्मित असल्याचे खोटे घोषित करून आयातबंदी टाळण्याचा प्रयत्न केला गेला. तपासणीत या वस्तूंचा उगम पाकिस्तानमधूनच झाल्याचे निश्चित झाले आहे.

दुबईस्थित भारतीय पुरवठादाराचा सहभाग

सुक्या खजुरांच्या प्रकरणात, दुबईस्थित एका भारतीय पुरवठादाराने बनावट बिले तयार करून या मालाच्या वाहतुकीस मदत केल्याचे आढळले आहे. या पुरवठादाराने कमिशनवर काम केले असून, भारत आणि पाकिस्तानमधील वस्तूंच्या आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा लपवण्यासाठी त्याने स्वतःच्या कंपन्यांचा वापर केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in