वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या लॉजिंग, बोर्डिंगवर छापा; तीघांना अटक

महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती
वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या लॉजिंग, बोर्डिंगवर छापा; तीघांना अटक

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने एपीएमसीतील एस. के. लॉजिंग/एम. जी. लॉजींग अॅंड बोर्डिंगवर छापा मारुन त्याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आलेल्या पाच महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी लॉजचा मॅनेजर व दोघे दलाल या तीघांविरोधात पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन तीघांना अटक केली आहे.

एपीएमसीतील एस. के. लॉजिंग/एम. जी. लॉजींग अॅड बोर्डिंगमध्ये अल्पवयीन मुलीं व महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनावणे व त्यांच्या पथकाने सदर लॉजवर कारवाई करण्यासाठी गत गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहकाला वेश्यागमनासाठी पाठवून दिले होते.

यावेळी सदर लॉजच्या मॅनेजरने दोन दलालांना संपर्क साधुन लॉजमध्ये सात महिलांना वेश्यागमनासाठी बोलावून घेतले. बनावट ग्राहकाने वेश्यागमनासाठी एका मुलीची निवड केल्यानंतर मॅनेजरने बनावट ग्राहकाकडून ३५०० रुपये स्वीकारुन त्याला महिलेसोबत वेश्यागमानासाठी लॉजमधील रुममध्ये पाठवून दिले.

त्यानंतर बनावट ग्राहकाने दिलेल्या इशाऱ्यांनंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सदर लॉजवर छापा मारला. यावेळी पलिसांच्या पथकाने सदर लॉजची तपासणी केली असता, त्याठिकाणी वेश्याव्यसायासाठी बोलावण्यात आलेल्या सात महिला व तरुणी आढळून आल्या. नवी मुंबईत अनेक प्रकारे लॉज आणि बार असल्यामुळे अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे पहावयास मिळत आहे.पोलीस प्रशासन आपली जबाबदारी चोख बजावत असले तरी अशा गोष्टींना आळा बसलेला नाही आहे.

त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने लॉजचा मॅनेजर विरेंद्र यादव (३२) तसेच महिलांना वेश्याव्यवसायाठी घेऊन आलेले दोघे दलाल मिथीलेश प्रसाद साव (३१) व भागीप्रसाद यादव (५०) या तीघांवर एपीएमसी पोलीस ठाण्यात पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन तीघांना अटक केली. तसेच सदर लॉजमध्ये वेश्यागमनासाठी आणल्या गेलेल्या सात महिलांची सुटका केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in