लोटस तलावासाठी पर्यावरणप्रेमींचे आंदोलन; न्यायालयातही लढण्याचा निर्धार

नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर २७ मधील लोटस तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी सलग चौथ्या रविवारी तीव्र आंदोलन करत सिडकोविरोधात लढा अधिक तीव्र करण्यात आला. सिडकोकडून तलावात १०० ट्रक माती भरून भराव टाकण्यात आल्याचा आरोप करत तलाव नष्ट करण्याच्या प्रयत्नांचा पर्यावरणप्रेमींनी तीव्र निषेध केला.
लोटस तलावासाठी पर्यावरणप्रेमींचे आंदोलन; न्यायालयातही लढण्याचा निर्धार
Published on

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर २७ मधील लोटस तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी सलग चौथ्या रविवारी तीव्र आंदोलन करत सिडकोविरोधात लढा अधिक तीव्र करण्यात आला. सिडकोकडून तलावात १०० ट्रक माती भरून भराव टाकण्यात आल्याचा आरोप करत तलाव नष्ट करण्याच्या प्रयत्नांचा पर्यावरणप्रेमींनी तीव्र निषेध केला.

रविवारी लोटस तलाव परिसरात नागरिक, सामाजिक संस्था, वकील, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी 'पर्यावरण टिकवा, लोटस लेक वाचवा' अशा घोषणा देत तलावाभोवती वॉकेथॉन केले आणि सिडकोच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.

पर्यावरणप्रेमी आणि सेव्ह लोटस लेक आंदोलनाचे अग्रणी सुनील अग्रवाल यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करत सांगितले की, 'सिडकोच्या विरोधात आम्ही आता रस्त्यावरची लढाईसोबतच न्यायालयातही सक्षमतेने लढणार आहोत. लोटस तलाव बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. ते म्हणाले की, नवी मुंबईच्या निसर्गसंपत्तीचा विध्वंस करणाऱ्या सिडकोला आता या शहरातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढेही एकत्र राहून या लढ्याला बळ देण्याची गरज आहे.

तसेच या पार्श्वभूमीवर विष्णुदास भावे नाट्यगृह येथे झालेल्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनतेच्या दरबारातही पर्यावरणप्रेमींनी लोटस तलाव वाचवण्याची मागणी केली. मंत्री नाईक यांना लेखी निवेदनही देण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in