एनएमएमटीच्या अपघातग्रस्त वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत

एनएमएमटीच्या अपघातग्रस्त वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत

अकबर मुलानी हे एनएमएमटी वाहक अपघात झाल्यामुळे दोन महिन्यांपासून घरीच होते. या कालावधीत त्यांना वेतनही मिळाले नाही.

नवी मुंबईतील कामगार अडचणीत सापडल्यास अथवा अपघातात जखमी झाल्यास त्याला व त्याच्या परिवाराला मदत करण्यासाठी, त्यांना चांगल्यातले चांगले उपचार मिळावेत यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनने पुढाकार घेतला आहे. नुकतेच या युनियनचे नवी मुंबईतील प्रमुख रवींद्र सावंत यांनी एनएमएमटीच्या ठोक मानधन वाहकाला अपघातानंतर दोन महिने वेतन न भेटल्याने आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून १२ हजार रुपयांचा धनादेश देत आर्थिक मदत केली आहे.

अकबर मुलानी हे एनएमएमटी वाहक अपघात झाल्यामुळे दोन महिन्यांपासून घरीच होते. या कालावधीत त्यांना वेतनही मिळाले नाही. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलानी व त्यांचा परिवार आर्थिक संकटात सापडला होता. ही बाब कामगार नेते रवींद्र सावंत यांना समजताच त्यांनी तत्काळ महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत मुलानी यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांना नेरूळ सेक्टर दोन मधील इंटकच्या कार्यालयात १२ हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश दिला. यावेळी महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सावंत तसेच संजय सुतार, राजेंद्र जाधव, अशोक बिराजदार, एनएमएमटी युनिटचे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल लक्ष्मण चांदणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in