महेश जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड; ३० मनसैनिकांविरोधात गुन्हे दाखल

मनसैनिकांनी महेश जाधव यांच्या कामोठे येथील कार्यालयात घुसून त्याची तोडफोड केली होती. या प्रकारानंतर कामोठे पोलिसांनी ३० मनसैनिक यांविरोधात मनाई आदेशाचे उल्लंघन गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महेश जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड; ३० मनसैनिकांविरोधात गुन्हे दाखल
Published on

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हद्वारे मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. तसेच अमित ठाकरे व त्यांच्या सहकाऱयांवर त्यांना मारहाण केल्याचा देखील आरोप केला होता. या प्रकारानंतर संतफ्त झालेल्या मनसैनिकांनी महेश जाधव यांच्या कामोठे येथील कार्यालयात घुसून त्याची तोडफोड केली होती. या प्रकारानंतर कामोठे पोलिसांनी ३० मनसैनिक यांविरोधात मनाई आदेशाचे उल्लंघन गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महेश जाधव हे मंगळवारी काही माथाडी कामगारांच्या मागण्या घेऊन अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी राजगड (मनसे कार्यालय) येथे गेले असताना त्याठिकाणी अमित ठाकरे यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला होता. त्यानंतर महेश जाधव यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावरुन व्हायर करुन राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. तसेच या आरोपानंतर ते लोक आपल्याला मारून टाकतील, अशी भिती व्यक्त करत आपल्याला काही झाल्यास राज आणि अमित ठाकरे हे दोघेच जबाबदार असतील, असेही महेश जाधव यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले होते. त्यानंतर महेश जाधव खारघर मधील मेडीकव्हर हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर २५ ते ३० मनसे कार्यकर्त्यांनी महेश जाधव यांच्या कामोठे सेक्टर-७ मधील कार्यालयात घुसून तोडफोड केली. दरम्यान, मनाई आदेश असताना २५ ते ३० मनसैनिकांनी एकत्रीत येऊन महेश जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याने कामोठे पोलिसांनी या सर्व मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in